भारतातील राज्य सरकारे महिलांची आर्थिक आणि सामाजिक स्थिती सुधारण्यासाठी उपाययोजना करत राहतात. याच पायावर महाराष्ट्र सरकारने महिलांचा सामाजिक आणि आर्थिक स्तर उंचावण्यासाठी एक योजना आणली आहे. या योजनेचे नाव “माझी कन्या भाग्यश्री” असे आहे.
विषयसूची (contents)
- उद्देश (Objective)
- कोण अर्ज करू शकतो? (पात्रता)
- कोण अर्ज करू शकत नाही? (अपात्र)
- माझी कन्या भाग्यश्री योजनेचे लाभ
- सदर योजनेचे अटी
- अर्ज कुठे मिळवायचा आणि अर्ज कसा करायचा
- योजनेचा सारांश
उद्देश (Objective)
(1) मुलींचा जन्मदर वाढवणे.
(2) लिंग निवडीस प्रतिबंद करणे.
(3) मुलीचे शिक्षण आणि आरोग्य सुधारणे.
(4) बालविवाह रोखणे.
कोण अर्ज करू शकतो? (पात्रता)
(1) लाभार्थी मुलीचे वडील हे महाराष्ट्राचे मूळ रहिवाशी असावेत.
(2) एका मुली नंतर माते/पित्याने कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केली असेल ते.
(3) दोन मुली नंतर माते/पित्याने कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केली असेल ते.
(4) एका मुली नंतर दुसर्या वेडेला जर जुडवे मुली झाले, तर तिन्ही मुली या योजने साठी पात्र आहेत.
(5) परिवाराची वारशिक उत्पण्ण 7.5 लाखा पेक्षा कमी असले पाहीजे.
(6) बालगृहातिल अनाथ मुली या योजेने साठी पात्र आहेत
कोण अर्ज करू शकत नाही? (अपात्र)
(1) ज्या मातेने/पित्याने दोन मूली नंतर कुटुंब नियोजन केलेली नाही, ते अपात्र आहेत.
(2) ज्या मात्या/पित्यान्ना एक मुलगा आणि एक मुलगी आहे, ते सुधा अपात्र आहेत.
माझी कन्या भाग्यश्री योजनेचे लाभ
(1) जर एक मुलगी असेल तर महाराष्ट्र शासना कडून तिच्या नावे बँकेत 50000/- ची गुंतवणूक केली जाईल.
(2) जर दोन मुली असेल तर महाराष्ट्र शासना कडून त्यांच्या नावावर प्रत्यकी बँकेत 25000/- ची गुंतवणूक केली जाईल.
(3) पहिल्या चरणात एक मुलगी वयाच्या 6 व्या वर्षी 50000/- वर जमा झालेले व्याज काढू शकते, मूळ रक्कम (50000/-) पुन्हा गुंतवावी लागेल.
(4) दुसऱ्या चरणात एक मुलगी वयाच्या 12 व्या वर्षी 50000/- वर जमा झालेले व्याज काढू शकते, मूळ रक्कम (50000/-) पुन्हा गुंतवावी लागेल.
(5) तिसऱ्या चरणात एक मुलगी वयाच्या 18 व्या वर्षी 50000/- वर जमा झालेले व्याज आणि मुद्दल रक्कम दोन्ही काढू शकते.
सदर योजनेचे अटी
(1) सदर योजना बँक ऑफ महाराष्ट्र मारफत राबविन्यात येइल.
(2) मातेने/पित्याने कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया केल्याचा प्रमाणपत्र योजनेचे लाभ घेन्या पुर्वी सादर करणे आवश्यक आहे.
(3) लाभार्थी मुलीचे वडील महाराष्ट्र राज्याचे मूळ रहिवाशी असने गर्जेच आहे.
(4) योजनेचे लाभ घेण्यसाठी अर्ज कर्ताना बालिकेचे जन्म नोंदणी प्रमानपत्र सादर करणे अवश्यक आहे.
(5) 18 व्या वर्षी मूळ रक्कम आणि जमा झालेले व्याज तेव्हाच काढता येईल जेव्हा मुलगी 18 वर्षांची होईल आणि ती 10 वीची परीक्षा उत्तीर्ण होईल आणि विवाहित नसेल.
(6) सदर योजना आधार सोबत जोडन्यात येइल.
(7) 18 वर्षे पूर्ण होण्यापूर्वी, जर मुलीचे लग्न झाले किंवा 10 वी पूर्वी शाळा सोडली तर तिच्या पालकांना या योजनेचा कोणताही लाभ मिळणार नाही. या प्रकरणात मूळ रक्कम आणि जमा झालेले व्याज महाराष्ट्र सरकारकडे हस्तांतरित केले जाईल.
(8) कृपया लक्षात घ्या की या योजनेचा लाभ देण्यासाठी कोणताही मध्यस्थ किंवा गैर-सरकारी व्यक्ती असणार नाही.
अर्ज कुठे मिळवायचा आणि अर्ज कसा करायचा
या योजनेसाठी, सर्व आवश्यक अर्ज खालील नमूद केलेल्या शासकीय विभागाकडे विनामूल्य उपलब्ध आहेत:-
(1) राज्यातिल प्रत्येक ग्रामिण व नागरी बाल विकास प्रकल्प अधिकारी.
(2) महिला व बाल विकास अधिकारी, जिल्हा परिषद.
(3) जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी.
या योजनेचा अर्ज आणि आवश्यक कागदपत्रे अंगणवाडी सेविका यांना सादर करा. या प्रक्रियेत अंगणवाडी सेविका तुम्हाला आवश्यक ती मदत पुरवतिल.
योजनेचा सारांश
अ.क्र. | लाभ मिळविण्या पात्र लाभार्थी | शासनाकडुन बँकेत गुंतवणूक करण्यात येनारी रक्कम | मुलीच्या वयाच्या टप्प्यांनुसार वितरीत केली जाणारी रक्कम |
---|---|---|---|
1 | एका मुलीनंतर कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केलेल्या पालकांना वितरित करण्यात येणारी रक्कम | मुलीच्या नावावर बँकेत 50000 रुपये गुंतवले जातील. | (1) पहिल्या चरणात एक मुलगी वयाच्या 6 व्या वर्षी 50000/- वर जमा झालेले व्याज काढू शकते, मूळ रक्कम (50000/-) पुन्हा गुंतवावी लागेल. (2) दुसऱ्या चरणात एक मुलगी वयाच्या 12 व्या वर्षी 50000/- वर जमा झालेले व्याज काढू शकते, मूळ रक्कम (50000/-) पुन्हा गुंतवावी लागेल. (3) तिसऱ्या चरणात एक मुलगी वयाच्या 18 व्या वर्षी 50000/- वर जमा झालेले व्याज आणि मुद्दल रक्कम दोन्ही काढू शकते. मातेने/पित्याने कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया केल्याचा प्रमाणपत्र सादर केल्या नंतरच मुलीच्या नावावर पैसे जमा करण्यात येइल. |
2 | दोन मुलीनंतर कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केलेल्या पालकांना वितरित करण्यात येणारी रक्कम | पहिल्या आणि दुसऱ्या मुलीच्या नावावर प्रत्येकी 25000 रुपये गुंतवले जातील. म्हणजे एकूण 50000 रुपये बँकेत गुंतवले जातील. | (1) पहिल्या चरणात एक मुलगी वयाच्या 6 व्या वर्षी 25000/- वर जमा झालेले व्याज काढू शकते, मूळ रक्कम (25000/-) पुन्हा गुंतवावी लागेल. (2) दुसऱ्या चरणात एक मुलगी वयाच्या 12 व्या वर्षी 25000/- वर जमा झालेले व्याज काढू शकते, मूळ रक्कम (25000/-) पुन्हा गुंतवावी लागेल. (3) तिसऱ्या चरणात एक मुलगी वयाच्या 18 व्या वर्षी 25000/- वर जमा झालेले व्याज आणि मुद्दल रक्कम दोन्ही काढू शकते. मातेने/पित्याने कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया केल्याचा प्रमाणपत्र सादर केल्या नंतरच मुलीच्या नावावर पैसे जमा करण्यात येइल. |
Great Content